पाटण प्रतिनिधी /श्रीगणेश गायकवाड : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने शहरासह ग्रामीण भागात संसर्गजन्य आजार वाढले असून विविध वयोगटातील रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत आहेत बदललेल्या वातावरणाचा फटका जाणवू लागल्याने नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत दिवसेंदिवस आजारग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्ण गर्दी करताना दिसून येत आहेत पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यू मलेरिया अशा रोगांचा धोका असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम पडू लागला आहे त्यातच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्यात बदल होतो व होणाऱ्या बदलामुळे नदी तसेच विहिरी व हातपंपातील दूषित पाण्यामुळे अनेकदा नागरिकांना त्रास होतो त्यातच पावसामुळे होणारी घाण, सर्वत्र अस्वच्छता व इतर कारणाने साथीचे आजार होण्याची शक्यता असते.कारण पावसामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असते यामुळे पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार लक्षात घेता आरोग्य विभागासह पंचायत समितीने लक्ष देणे गरजेचे आहे त्यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची काळजी महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याचा नियमितपणे व स्वच्छ प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे याचबरोबर गावात स्वच्छता कशी राहील कोणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आधीच दोन वर्षापासून नागरिक कोरोना या संसर्गजन्य आजाराने धास्तावलेले आहेत त्यामुळे आता प्रत्येक आजारापासून साथीच्या रोगापर्यंत लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाने वेळीच सावध होण्याची गरज आहे फक्त प्रशासन नाहीतर लोकांनीही याबाबत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहेबदलत्या वातावरणाचा शहरासह ग्रामीण भागात प्रभाव दिसू लागला आहे सद्यस्थितीत सर्दी खोकला अंगदुखी आदी समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयात वाढत आहे या पावसाळी वातावरणाचा सर्वाधिक फटका बालकासह वृद्धांना बसताना दिसून येत आहे परिणामी शासकीय खाजगी रुग्णालयात पालक गर्दी करताना दिसून येत आहेत

या पावसाच्या कालावधीत बालक व वृद्धांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञ देत आहेत पावसाळ्याच्या कालावधीत जलजन्य आजार व डासापासून उद्भवणारे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण अधिक असते अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यप्रती जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे मलेरिया,डेंगू, अशा साथीच्या रोगांचा संक्रमणाचा धोका अधिक असतो त्यामुळे नियमित मच्छरदाणीचा उपयोग करावा आपला परिसर स्वच्छ ठेवावा पिण्याचे पाणी उकळून प्यावे व आजारी पडल्यास ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत अशी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे






















