कराड तालुका प्रमुख पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ रणजित पाटील यांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज कराड : प्रतिनिधी लाॅकडाऊन असताना ही शहरात रोज अनेक जण विनाकारण फिरत असल्यामूळे पोलिसांनी आज कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक या ठिकाणी अनेक वाहनांवर कारवाई करीत ती वाहने जप्त केली.भेदा चौकात पो.उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांनी स्वता अनेक वाहने अडवत कारवाई सूरू केली.ही कारवाई करीत असताना पाटील यांनी एका दूचाकी चालकास आडवले, त्याची विचारपूस करताच तो चक्क पाॅझिटिव्ह असल्याचे समजाताच पाटील व उपस्थित पोलिस कर्मचारी आवक झाले.सबंधित बाधित आल्याने तो अन्य तपासणीस एकाटाच दूचाकीवरुन जात होता.पाटील यांनी त्यास शेलक्या शब्दात सूनावत सूचना करुन जाऊ दिले.याची चर्चा चौकात बराच वेळ सूरू होती.
मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करून विनाकारण, नाहक फिरणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या जप्त करण्याचा धडाका सुरू झाल्याने विजय दिवस चौक ते भेदा चौक,पोपटभाई पंप रोडवर वहातूक काही काळ विस्कळीत झाली.या कारवाइने विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांनी मध्ये चांगली तारांबळ उडाली.
सकाळी सात ते अकरा सुरू असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद आहेत.तरी ही नागरिक,दूकानदार पार्सल सेवेच्या नावाखाली व या ना त्या कारणासाठी बाहेर पडताना फिरताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक नाकाबंदी केली. विनाकारण फिरणार्या शेकडो दुचाकी जप्त केले आहेत. अनेक वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान नाका-बंदी ठिकाणी वाहन तपासणी सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करून पुन्हा तपासणी मोहीम सुरू केली. शहरात अनेक ठिकाणी बॅरेगेटस लावण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, विनाकारण रस्त्यावर फिरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहनही पो.उपविभागीय अधिकारी रणजीत पाटील यांनी केले आहे.