सातारा : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 875 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
बाहेरी जिल्ह्यातील इस्लामपूर जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, वाटेगाव ता. वाळवा 2, रेठरे ता. वाळवा 1, विटा जि. सांगली 1, नवी मुंबई 1, पुणे 1, बेलापूर मुंबई 1,
*11 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे आसनगांव सातारा येथील 42 वर्षीय पुरुष,विकासनगर सातारा येथील 65 वर्षीय महिला,राजेवाडी निगडी येथील 52 वर्षीय पुरुष, महागांव येथील 70 वर्षीय पुरुष,शिवथर येथील 85 वर्षीय पुरुष, वडूज येथील 72 वर्षीय महिला,पाटखळ येथील 65 वर्षीय महिला,पाल ता.कराड येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये यशवंतनगर,वाई येथील 70 वर्षीय पुरुष, खडकी ता.वाई येथील 52 वर्षीय पुरुष, काळगांव ता.कराड येथील 42 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.