माणगंगा नदीतून आतापर्यंत च्या इतिहासात सर्वात जास्त वाळू चोरी या महसूल अधिकारी यांच्या साहाय्याने झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. महसूलचे कर्मचारी या नदीपासून काही मिनिटाच्या अंतरावर राहायला आहेत तरीही यांना वाळू चोरत असताना दिसत का नाही? यांना jcb, डम्पर, ट्रॅक्टर याचा आवाज का येत नसावा अशी नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे
माणगंगा नदीतून आतापर्यंत च्या इतिहासात सर्वात जास्त वाळू चोरी या महसूल अधिकारी यांच्या साहाय्याने झाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. महसूल चे कर्मचारी या नदीपासून काही मिनिटाच्या अंतरावर राहायला आहेत तरीही यांना वाळू चोरत असताना दिसत का नाही. यांना jcb, डम्पर, ट्रॅक्टर याचा आवाज का येत नाही. जर सातारा वरून येउन गुन्हे शाखा कारवाई करत असेल तर माण तालुक्यातील स्थानिक प्रशासन नक्की कोणते काम करत आहे. असा सवाल निर्माण होतोय
सोमवार पहाटे पळशी ओढ्यातुन वाळु तस्करी करणार्यांवर गुन्हे शाखेने कारवाई केली माण तालुक्यात करोनाचे रुग्ण सापडु लागल्याने प्रशासन सध्या कोरोनाच्या महामारीचा सामना करण्यात व्यस्त असल्याची नामी संधी वाळु तस्करांना निर्माण झाली असुन या संधीचा लाभ घेण्यासाठी वाळु तस्कर पुढे सरसावले असल्याची खबर सातारा गुन्हे विभागाला लागल्याने त्यांनी सापळा रचुन पळशी ओढ्यातुन वाळुची तस्करी करणार्या दोन ट्रँक्टरवर कारवाई करीत सुमारे १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत म्हसवड पोलीसांच्या ताब्यात दिला.याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनकडुन समजलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे माण तालुक्यातील पळशी गावातील ओढ्यातुन बेकायदेशीर वाळु तस्करी राजरोजपणे सुरु असल्याची खबर सातारा येथील गुन्हे विभागाला मिळाल्यावर गुन्हे विभागाचे स.पो.नि. आनंदसिंग साबळे, पो. ना. बेबले, पो. ना. गोंगावले, पो.ना.कर्णे, पो.ना. काटकर, पो.चालक सावंत यांचे एक पथक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पळशी येथे आले याठिकाणी त्यांनी ओढ्यालगत सापळा रचुन दबा धरला असता पळशी गावातील स्मशान भुमीच्या पाठीमागे मध्यरात्री ३ वा.३० मि. काही लोक बँटर्याच्या साह्याने ट्रँक्टरच्या ट्रॉलीमध्ये खार्याच्या व पाटीच्या साह्याने वाळु भरत असल्याचे निदर्शनास येताच दबा धरुन बसलेल्या गुन्हे विभागाच्या या पथकाने अचानकपणे त्याठिकाणी धाड टाकुन माण गंगा नदीपात्रात उभे असलेले दोन ट्रँक्टर ताब्यात घेतले यावेळी ट्रँक्टरमध्ये वाळु भरणारे इतर लोक अधांराचा फायदा घेत बाजुच्या शेतात पळुन गेले यावेळी ट्रँक्टर चालक असलेले हुसेन दिलावर मुलाणी व सागर बाळु माने या दोघांना या पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडील वाहने जप्त करुन त्यातील वाळुचा मुद्देमालाचा पंचनामा करुन वरील दोघांना व त्यांच्याकडील वाहनांना म्हसवड पोलीसांच्या ताब्यात देवुन हे पथक पुन्हा सातारा येथे रवाना झाले. दरम्यान माण तालुक्यात सुरु असलेली वाळु तस्करी ही सातारच्या पोलीसांना दिसते मात्र ती स्थानिक पोलीसांना कशी दिसत नाही याबाबत संपुर्ण तालुक्यात उलट – सुलट चर्चा सुरु आहेत