महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
वाई शहरात दुचाकी सह चारचाकी मधुन मास्क न लावता अनावश्यक फिरणार्या बेजबाबदार नागरीकांना कोरोनो कालावधीत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्या साठी अखेर वाई पोलिसांना पुन्हा रस्त्यावर उतरुन दंडात्मक कारवाईचा बडगा ऊगारुन शिस्तीच्या धड्यांचे दुदैव्याने ठोस पाजावे लागले आज दिवसभरात किसनवीर चौक गणपती मंदिर आणी भिम नगर तिकाटणे या मुख्य चौकात
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस कर्मचार्यांनी शेकडो वाहन चालकांन वर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरूच ठेवला होता या अचानक पणे सुरु झालेल्या कारवाई मुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि गेल्या 20 दिवसा पासून वाई शहरासह तालुक्यातील ७४ गावांन मध्ये नागरीक मास्कचा वापर न करताच बेजबाबदार
पणाने फिरत असल्या मुळे कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव गतीमान झाल्या मुळे दिवसे दिवस कोरोनो पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने
वाढताना दिसत आहे वाई शहरात आज अखेर कोरोनो पॉझिटीव्ह रुग्ण संख्या ५५२ इतकी झाली आहे तर १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ग्रामीण भागातील जवळपास ७४ गावांन मध्ये आज अखेर १०५३
इतके पॉझिटीव्ह रुग्ण संख्या झाली आहे आणी ऊपचारा दरम्यान ३२ जनांचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्याची एकुण १६०५ इतकी पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे तर ४८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही वाई शहरा सह तालुक्यातील जनतेला याचे कसलेच गांभीर्य वाटत नसल्याने वाढत्या

रुग्ण संख्येची गंभीर दखल वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घेऊन त्या वर तातडीने ऊपाय योजना करण्या साठी आपले सहकारी सपोनि आशीष कांबळे पिएसआय संजय मोतेवार व कर्मचारी या आपल्या सहकार्यान बरोबर चर्चा करुन कोरोनोची वाढती रुग्ण संख्येची साखळी तोडण्या साठी स्वताच्या जिवाची पर्वा न करता प्राण पणाला लावून पोलिस यंत्रणेलाच रस्त्यावर उतरुन हि साखळी तोडण्याचे काम केले तरच नागरिकांचे जिव वाचतील असे मत मांडुन खोबरे यांनी अखेर स्वतासह इतर सहकारी व पोलिस कर्मचारी आज दि, ५ रोजी किसनवीर चौक भिम नगर तिकाटणे गणपती मंदिर चौक अशा मुख्य चौकान मध्ये सापळे लावुन मास्क न लावता अनावश्यक फिरणार्या शेकडो बेजबाबदार दुचाकी चारचाकी वाहन चालकांन वर प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करुन कोरोनो काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे ऊलंघन केल्यास काय घडते याचा जणु हिसकाच दाखवला आहे पण जबाबदारीची जाणीव ठेवून वागणार्या नागरीकांनी बाकी वाई पोलिसांनी अचानक पणे केलेल्या या कारवाईचे कौतुक केले आहे.























