बावधन ( ता वाई) येथील तीन जण तीन महिन्यासाठी वाई, सातारा,महाबळेश्वर,खंडाळा तालुक्यातून तडीपार.. गर्दी,मारामारी दमदाटी करण्याचे गुन्हे दाखल होते. वाई पोलीस ठाण्याने वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊन त्याप्रमाणे नोटीस बजावली होती. त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने वाई पोलीस ठाण्याने समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण होऊ नये म्हणून त्यांच्या तडीपरीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सादर केला होता. त्या प्रमाणे आज पोलीस अधीक्षकांनी तिघांच्या तडीपरीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
वाई पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गणी वरील तिघांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊन देखील त्यांच्या वागण्या मध्ये कसलीही सुधारणा न झाल्याने व तालुक्यातील नागरिकांना यांची केलेल्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व त्यामुळे नागरिकांमधून यांच्या विरुद्ध तक्रारी पाऊस पडत असल्याने जनते मधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी वाढत चालल्याने पुढे भविष्यात या तिघांकडून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या टोळीत रूपांतर होऊन त्यांच्याकडून मोठ्या घटना घडू शकतात हे नाकारता येत नसल्याने त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी नाविलाजास्तव वाई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी यांनी वरील तिघांच्या विरोधात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण घेऊन त्या पासून गंभीर समस्या निर्माण घेण्याआधीच त्यांना सातारा वाई महाबळेश्वर खंडाळा अशा पाच तालुक्यातून तडीपार करण्याचा मागणीचा प्रस्ताव वाई पोलीस ठाणे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांना पाठविला होता .
वरील तिघांवर विविध प्रकारची गुन्हे वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने त्यांचा गंभीर विचार करून अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी वरील पाच तालुक्यातून तीन महिन्यासाठी तडीपार केल्याचे आदेश काढले आहेत त्या काढलेले आदेशामुळे वाई तालुक्यातील अनेक दहशत निर्माण करणार्यांचे धाबे दणाणले आहेत तर वरील तिघांना तडीपार केल्याने वाई तालुक्यातील नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते वाई विभागाचे डी वाय एस पी अजित टिके वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे सपोनि आशिष कांबळे आणि पीएसआय संजय मोतेवार या अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी आभार मानले आई या वाई पोलीस स्टेशनच्या केलेले या धाडसी कारवाईचे वाई तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे