महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :आकाश दडस (बिदाल)
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण तालुक्यातील गटेवाडी येथील मेंढपाळ अंबाजी गणू गोरड यांना माडग्याळ जातीच्या मेंढ्या जोपासण्याचा छंद जडला आहे. त्यांनी या छंद व हौसेपोटी भांडवल गुंतवून मेंढ्याबरोबर नर मेंढा पाळला आहे़ .त्यांच्याकडे असणाऱ्या नर जातीच्या माडग्याळ मेंढ्याला तब्बल पाच लाखाची मागणी आले आहे तरी माझा बकरा विकायचा नाही असे या मत या मेंढपाळांनी व्यक्त केले.
गटेवाडी येथील मेंढपाळ अंबाजी गोरड यांनी शेतीबरोबरच गेल्या ६ वर्षापासून माडग्याळ जातीच्या मेंढ्या पाळण्याचा छंद जोपासला आहे. त्यांनी हौसेपोटी जातीवंत माडग्याळ जातीचा नर मेंढाही जोपासला असून त्याच्या कपाळावर राघूची चोची असल्याने या मेंढ्याला मोठी मागणी आहे़ सध्या त्यांच्याकडे माडग्याळ जातीच्या लहान-मोठ्या ६० मेंढ्या आहेत. त्यांनी या मेंढ्यानाच आपली बागायत शेती मानून वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत असल्याचे ते सांगतात.

पश्चिम महाराष्ट्रातील माण, माळशिरस, खटाव, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला,पंढरपूर आदी तालुक्यातील माडग्याळ जातीची मेंढरे पाळणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्याच बरोबर कर्नाटकातील इंडी येथेही मेंढपाळ माडग्याळ मेंढ्या मोठ्या संख्येने पाळतात.
माडग्याळ मेंढी तुलनेत गाभण काळ कमी असतो. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीत त्या तीनवेळा वेतात. जरी मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
मेंढपाळ व्यवसाय हा पारंपारिक असला .तरी संक्रमित जातीच्या माडग्याळ मेंढ्याचे पालन केले तरी तरुण मेंढपाळांना लाख रुपयाचा नफा मिळू शकतो त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता गावाकडेच मेंढपाळ व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला तर पगारापेक्षा जास्त उत्पन्न हे मेंढपाळ व्यवसाय यातून मिळू शकते.





















