वाई : रोटरी क्लब ऑफ वाई तर्फे दि. २८ नोव्हेंबर रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार, रोटरी क्रीडापटू पुरस्कार, व रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
आपल्या विद्यार्थ्यांना चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला. यावर्षी रोटरीने नवीन संकल्पना अमलात आणून त्यामधून टेक्नोसेव्ही शिक्षकांची निवड केली. कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू न देता अनेक कल्पना वापरून ज्या शिक्षकांनी शिकवण्याचा वसा कायम ठेवला अशा संतोष जाधव (कांबाटवाडी), जयश्री शिरसागर (शाळा नंबर ५) , दीपक कासवेद (केंजळ), मनीषा पारखे (केंजळ), शकिलाबानू शेख (आसरे) या शिक्षकांना “रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.
वाई मधील व आजूबाजूच्या खेडोपाडी अनेक विद्यार्थी खेळाला शिक्षणा इतकेच महत्त्व देतात व वेगवेगळ्या खेळ प्रकारात तरबेज होऊन बक्षिसे मिळवतात अशामधील १० खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून “रोटरी उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अंजली गोंजारी, शरण अंधारे, वेदांतिका जाधव, ध्रुव धुमाळ, अमिता जाधव, पल्लवी शिंदे, वेदांत कदम, आकांक्षा शेलार, साहिल घाडगे, सिद्धांत ननावरे यांना पुरस्कार मिळाले. याप्रसंगी त्यांचे प्रशिक्षकही उपस्थित होते.
रोटरीमध्ये अनेक वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक आपापल्या परीने समाजकार्य करीत असतात. अशा गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या संचालिका रो. संजीवनी कद्दू आणि शिरवळ येथील ज्येष्ठ डॉ. विनय जोगळेकर यांना “रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब वाई व रोटरी क्लब शिरवळ यांचे खूप जुने मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे डॉ जोगळेकर यांनी नमूद केले. तर service above self हा रोटरीचा गाभा आहे असे, रो. संजीवनी कद्दू यांनी सांगितले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी पुणे येथून रोटरी इंटरनॅशनलचे झोन ७ चे रिजनल कोऑर्डिनेटर पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रवी धोत्रे व वाई पंचायत समिती वाईचे गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी उपस्थित होते. अध्यक्ष रो. दीपक बागडे यांनी क्लबनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली व यावर्षी शिक्षण क्षेत्रात भरघोस काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळत असतील तर त्याची मानसिकता ओळखून त्यापद्धतीने त्याला शिकवा, घडवा, व एक चांगला नागरिक बनवा असे, मत पी डी जी रवी धोत्रे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थांसाठी ४०० एज्युकेशनल टॅब देत असल्याचे जाहीर केले. याच टॅबच्या माध्यमातून वाई तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचे धेय्य रोटरी क्लब ऑफ वाई नक्कीच साध्य करेल असे, मत डी.जी. एन. स्वाती हेरकळ यांनी व्यक्त केले.
कोविड काळात खूप शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे, आपण आज दिलेले राष्ट्र शिल्पकार पुरस्कार त्यांच्या कामाची पोहचपावती आहे, असे मत सुधीर महामुनी यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ वाईचे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉ. शरद अभ्यंकर यांना तिसऱ्यांदा मानाची पॉल हॅरिस पिन मिळाली.रो. डॉ. मिलिंद शहा यांनी आतापर्यंत २५०००पेक्षा जास्त रक्कम द रोटरी फाउंडेशनला देवून सेकंड लेव्हल मेजर डोनर हा मान प्राप्त केला.
क्लबचे सदस्य रो. संजय राऊत यांनी वाई एम. आय. डी. सी. मधील गरवारे कंपनीचे संचालक म्हणून नुकतीच जबाबदारी स्विकारली. आपल्या वाईची कन्या स्नेहांजली राजेंद्र ननावरे हीची इंडियन नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट (क्लास १ ऑफिसर) म्हणून निवड झाली त्याबद्दल तिलाही शुभेच्छा देण्यात आल्या. रो. डॉ. शंतनु अभ्यंकर यांच्या “आरोग्यवती भव” व रो. डॉ. सुनील देशपांडे यांच्या “रुंजी” पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. व यासर्वांचे विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.
वाई अर्बन बँकेचे चेअरमन सी.व्ही. काळे, व्हाईस चेअरमन चेरमन चावलानी साहेब व इतर सदस्य यांनी रो. संजीवनी कद्दू, डॉ. जोगळेकर व डॉ. अभ्यंकर यांचा विशेष सत्कार केले.या पुरस्कार सोहळ्यासाठी वाई तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक, एन. सी. सी.चे विद्यार्थी, अनेक खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते व सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ वाई चे उपाध्यक्ष रो. डॉ. जितेंद्र पाठक यांनी सूत्रसंचलन केले तर सचिव रो डॉ प्रेरणा ढोबळे यांनी सर्वांचे आभार मानले.
हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी डी.जी. एन. स्वाती हेरकळ, रो. प्रमोद शिंदे, रो.जितेंद्र पाठक, रो. डॉ. नितीन कदम, रो.अर्चना पाठक, रो.मदन पोरे, रो.सुनील शिंदे, रो.मदनकुमार साळवेकर, रो.डॉ.रूपाली अभ्यंकर, रो.डॉ. शंतनू अभ्यंकर, रो.मनिषा पोरे, रो. संतोष निकम, रो. पूरब शहा, रो. अल्पना यादव, रो. संजीवनी कद्दू , रो.डॉ.सुनील देशपांडे, रो.डॉ. शरद अभ्यंकर, रो.डॉ.जयश्री जगताप, रो.तारका कांबळी, रो. नीला कुलकर्णी व इतर रोटरी सदस्यांचे सहकार्य लाभले सर्वांचे धन्यवाद अध्यक्ष रो. दीपक बागडे आणि सचिव रो. डॉ. प्रेरणा ढोबळे यांनी मांडले.