सातारा क्लब हा नोंदणीकृत नसताना क्लबचे सचिवांनी व पदाधिकारी यांनी केलेला गैर कारभार याबाबत दि.११/६/२०२४ रोजी लेखी तक्रार सातारा शहर पो.स्टेशन मध्ये केली.
सदराचा क्लब हा नोंदणी कृत नसताना,क्लबचे पदाधिकारी यांनी सभासदांकडून पैसे कसे गोळा केले व ते खर्च कसे केलं यांचे उत्तर दिले नाही.सातारा क्लब हा सन २०२३ पर्यंत नोंदणीकृत नाही असे लेखी उत्त्तर क्लबचे व्यवस्थापक अमित कांबळे यांनी दिले असून तो गुन्ह्याच कबुल केला आहे
सातारा क्लब संदर्भात दाखल तक्रारी अर्जाची सातारा शहर पो.ठाणे यांचे कडून पोलीस चौकशी करत नाहीत याबाबत मुळ तक्रारदार यांनी दि.१५/८/२०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे झेडावंदन झाले नंतर आमरण उपोषणास बसणार व आत्मदहन करणार याबाबत दि.९/७/२०२४ रोजी अर्ज दिला.सदरचा अर्ज व त्याचे गांभीर्य पाहून तक्रारी अर्जाची चौकशी ही सात दिवसांत केली जाईल असे उत्तर सातारा पो स्टेशनकडून मिळाले आहे. सदराचे उत्तर व विषय विचारात घेऊन तक्रारदार श्री हणमंत फरांदे यांनी आमरण उपोषणाचा अर्ज मागे घेतला.
सदरकामी ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर हे कायदेशीर लढा चालू ठेवणार असून सरकारी जागेत असलेला क्लब हा नोंदणी कृत नसताना त्या जागेत परमीट रूम/ विक्री परवाना कसा दिला हा मुद्दा आता पटलावर येणार असून त्यासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे न्यायालया समोर येणार आहेत.