दि.१२/१२/२०२१ रोजी दु.३.०० वा प्रशांत प्रकाश पवार,ओंकार प्रकाश पवार,प्रकाश आबाजी पवार रा. सांगली फाटा ता खंडाळा हे तिघे पारगांव या गावी त्यांचे नातेवाईकां कडे आले (मामा-मामी) होते. सदर ठिकाणी चर्चा करून मोटर सायकल वरून माघारी पारगांव येथे आले. मोटार सायकल चालक प्रशांत प्रकाश पवार हो वेगाने मोटार सायकल असताना रस्त्याचे साईड पट्टीवर असलेल्या मातीत मोटार घसरली व रस्त्याचे संरक्षक अँगल जाऊनधडकल्याने अपघात झाला व प्रशांत रेलिंगच्या पलीकडे उडून पडला त्यास डोक्यास लागले मुळे जागीच मयत झाला व त्याचे वडील प्रकाश आबाजी पवार याचा पाय मोडला.
दि.१३/१२/२०२१ रोजी ओंकार प्रकाश पवार यांने सदर अपघात हा त्याचा सख्खा भाऊ प्रशांत पवार हा त्याचे अपघाती मृत्युस तसेच वडीलांचा पाय मोडणेस व माचीवर सायकलचे नुकसान होणेस कारणी भूत आहे या बाबतची अपघाताची खबर दिली व त्या प्रमाणे भा.दं वि. कलम २७८,३०४(अ) ३३७,३३८, मो.वा.का.कलम-१८४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला.
सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना मयत इसम प्रशातं त्यांचा भाऊ ओंकार व त्यांचे वडील हे त्यांचेच नातेवाईक असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सन २०१९ पासून बलात्कार करत होते असा मुद्दा समोर आले नंतर बलात्काराचा व पोक्सोचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून जखमी प्रकाश व त्याचा मुलगा ओंकार यांनी दि.१४/१२/२९२१ रोजी तीन महीला सह पुरूष आरोपींनी,”आम्हाला मारहाण करून प्रशांतचा खून केला व माझे वडीलांचा पाय मोडला असा दवाखान्यात जबाब दिला व पोलीसांनी सराव आरोपींवर भा.दं.वि. कलम-१४३,१४७,१४८,१४९,३०२,३०७,३२६,३२४,१२०(ब) २०१,५०४,५०६ ही वाढीव कलमे लावली व त्यानंतर पोलीसांनी आठही आरोपींना अटक केली तसेच ज्या(अल्पवयीन)मुलीवर तिची बदनामी केली जाईल अशी भिती घालून बलात्कार केला जात होता तिला सुध्दा पोलीसांनी अटक केली.
सदर पिडीत मुलीने पोलीस कोठडीत असताना,तिचेवर प्रेम प्रकरणी बदनाम करीन अशी भिती घालून तिचा मामा व तसेच तिचे दोन मामे भाऊ यांचे सन २०१९- २०२१ मध्ये जबरदस्ती करून वारंवार बलात्कार करत होते अशी फिर्याद दिली सबब भा.द. वि. कलम ३७६ व पोक्सो कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल झाला पण दोन हयात असलेल्या आरोपींना मात्र पोलीसांनी त्यांना अटक केली नाही, व त्यांचा अटकपुर्व जामीन मंजूर झाला,सदर गुन्ह्यांत दोषारोप पत्र दाखल झाले आहे.
सत्र खटला क्र. १६७/२०२३ मध्ये आरोपी हणमंत संपत यादव याचे जामीन अर्जावर युक्तिवाद ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर यांनी दि १२/१२/२०२१ रोजी घडलेल्या अपघाताची चौकशी करताना मयत प्रशांत पवार, त्याचा भाऊ व वडील हे बलात्कार व पोक्सोच्या गुन्ह्यात आरोपी होणार होणार व त्या कारवाईस बगल दिली व ओंकार पवार व प्रकाश पवार यांनी जबाब बदलला व पोलीसांकडून भा.दं.वि.कलम-१४३,१४७,१४८,१४९,३०२,३०७,३२६,३२४,१२०(ब) २०१,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करवून घेतला आहे मात्र तपासाचे सुरवातीची खबर, मयत पंचनामा, घटना स्थळ पंजनामा, दवाख्यान्याचे कागदपत्र हे सदरचा प्रकार हा अपघाताची आहे हे स्पष्ट करतो असा जोरदार युक्तीवाद केला. सदरकामी सरकार पक्ष कागद पत्रे नाहीत, पुढच्या तारखेस म्हणणे देतो अशी कारणे देऊन तारीख मागत होते व त्यास ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर यांनी सक्त हरकत घेऊन यापुर्वीच सरकारचे म्हणणे दाखल आहे, दोषारोप पत्र सन २०२१ सालीच दाखल आहे, सरकार कडे कागद पत्रे नाहीत असे कारण सांगणे योग्य नाही जर सरकार पक्ष युक्तिवाद करणार नसलास तसा आदेश करावा अशी सक्त हरकत घेतली सबब सरकार पक्षास युक्तिवाद कर्णास भाग पाडले.
ॲड विकास बा. पाटील यांनी केलेला मुद्देसुद युक्तिवाद व सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाने इतर आरोपांचा मंजूर केलेला जामीन विचारात घ्यावा हा मुद्दा मांडला. म् जिल्हा सत्र न्यायाधीश साो-१ वाई यांनी ते सर्व मुद्दे विचारात घेऊन हणमंत @ प्रकाश संपत यादव याचा जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणी खंडाळा तालुक्यातील विशेषत: लष्करातील निवृत्त जवानांसह सर्वांचे लक्ष लागले होते सदर कामी दोषारोप पत्र दाखल झाले असून आता खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे