भोर: यवत महाबळेश्वर रोडचा दुसरा टप्पा असणाऱ्या कापूरहोळ मांढरदेवी रस्त्यावर असणाऱ्या नेरे गावच्या हद्दीत असणारा फुल डंपर खचल्याने कोसळला. मुळातच दोन अडीच महिन्यापूर्वी केलेल्या या पुलाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्प पुरा होण्याआधीच अशाप्रकारे फुल कोसळल्याने संबंधित ठेकेदार सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाविषयी संशय निर्माण होतो.
सदर डंपर खचल्याने कोसळलेल्या फुलाची पाहणी केली असता, कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्टीलचा वापर केलेला आढळून आला नाही. एवढं बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला नेमका वरदहस्त कोणाचा. एवढं निकृष्ट काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणून-बुजून का दुर्लक्ष करतात, यामागचं रहस्य काय? अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
सदर खचलेल्या पुलाच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या गट नंबर १२२ मध्ये कोणत्याही प्रकारचे गटर न ठेवता दक्षिणेकडून येणारे रोडचे संपूर्ण पाणी या गटात सोडून दिले आहे. रस्ता उचलून घेतल्याने त्या बाजूस दरड निर्माण होऊन मोठा घटक शक्यता आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्या गटाचे मालक शिवाजी पाटणे यांनी केली.
संबंधित घटनेतून बोध न घेतल्यास भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. या अशा प्रकारच्या दर्जाहीन कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.