महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सातारा- सातारा पुणे या महामार्गावरील अनेवाडी टोल नाका,पाचवड,भुईंज,जोशीविहिर,सुरूर,वेळे आणि जांब या परिसरात दुचाकी आणि चार चाकीतुन विना मास्क फिरणाऱ्या 101 नागरिकांच्या विरुद्ध भुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी शाम बुवा पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी धकेबाज कारवाई करून तब्बल प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे झालेल्या कारवाई मधून तब्बल 50500 रुपयांचा महसूल गोळा करण्यास शाम बुवा याना यश आले आहे.
गेल्या 20 दिवसापासून वाई शहरासह तालुक्यातील गावागावानध्ये कोरोनो रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये आज अखेर 1180 पोसिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर एकट्या वाई शहरामध्ये 602 इतकी पोसिटीव्ह रुग्णाची संख्या आहे आज अखेर या कोरोनो रोगामुळे 55 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
20 मे रोजी वाई तालुक्यातील पूर्व भागातील असरे या गावांमध्ये पहिला पोसिटीव्ह पेशंट सापडला होता तेव्हा पासून प्रशासन त्या कोरोनो रोगाकडे पोलिसांच्या सहकार्याने गांभीर्याने पाहत होते पोलिसांचे भरपूर सहकार्य मिळत असल्याने 31 जुलै पर्यंत प्रशासनाला कोरोनो चे रुग्णांना थोपविण्यासाठी आले होते. वाई च्या पूर्व भागातील भुईंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये एक ऑगष्ट पासून कोरोनो रोगाने गावोगावी मुक्काम ठोकत दररोज नवी नवी गावे शोधत शोधत या कोरोनोच्या वाढत्या संख्येमुळे भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा हे चिंता ग्रस्थ झाले. अनेक गावनमध्ये मर्यादा पेक्षा कोरोनो चे रुग्ण सापडत असल्यामुळे याचे कसलेच गांभीर्य नागरिकांमधून दिसून येत नव्हते गावागावातील नागरिक मास्क न लावता किंवा सांमनतर अंतर न ठेवता. फिरताना दिसत होते. त्यामुळे या बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांच्या मुळे कोरोनो हा विषाणू गावोगावच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहचला त्यामुळे कोरोनो ची दिवसोनदीवस रुग्ण संख्या वाढत गेल्याने अनेकांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अशा भीषण घटना घडत असल्यामेळे भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा कोरोनो रुगांची वाढती संख्या रोकण्यासाठी त्यांनी आपले सहकारी रत्नदीप भंडारे व पोलीस कर्मचार्यांशी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व मास्क न लावता अनास्यक दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर आपणच कारवाई साठी प्राणाची बाजी लावून रस्त्यावर उतरलो तरच कोरोनो ची ही वाढती साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल असे सर्वांना समजून सांगितले.संपूर्ण पोलीस ठाणे भागातील अनेवडी टोल नाका,पाचवड,भुईंज,जोशीविहीर,सुरूर,वेळे आशा मुख्य रस्त्यांवर उतरून नागरिकांच्यावर कारवाई करण्याचे ठरल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हवलदार एम. जी .घाडगे, एस.एम.तोरडमल,दि.एम.धायगुडे,चंद्रकांत मुगसे,तुकाराम पवार ,अनंदा भोसले, प्रियांका कदम ,ए.वी.आवळे,एस.आर.पवार, पी.बी.दुदुष्कार,धनाजी कदम,एस.एस. नलवडे,बी.बी.कोळपे, डी. एम.गायकवाड ,आर.पी.कांबळे , तेजल कदम या सर्वांनी आज दि8 सकाळी 8 वाजल्यापासून भर पावसामध्ये रस्त्यावर उतरून तब्बल 101 विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर अच्यानक धडकेबाज प्रत्येकी 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करून 50500 महसूल गोळा करण्यास आणि बेजबाबदार नागरिकांना मास्क वापरण्याचा दंडात्मक धडा शिकवण्यास भुईंज पोलिसांना मोठे यश आले आहे
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये वाढती कोरोनो रुगणाची संख्या थोपवन्यासाठी भुईंज पोलिसांनी कंबर कसली आहे या पुढे हद्दीतील प्रत्येक गावात आपापल्या बीटा प्रमाणे पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्यावर अशा दंडात्मक करावाया करून कोरोनो रुग्णाच्या वाढत्या संख्येची साखळी तोडणार असल्याचे स पो नि शाम बुवा यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ही कारवाई करत असताना 23 हॉटेल मालकांवर व किराणा दुकांदारांवर समान तर ग्राहक व स्वतःमध्ये समांतर अंतर न ठेवल्यामुळे त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर दोन जणांवर विरुद्ध कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.