महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी : सुनील निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा,बारामती तालुका बहुजन हक्क परिषद व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या १८९ व्या स्मृती दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे माजी महसूल उपायुक्त शिवाजी राजे निंबाळकर यांनी त्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड,प्रगतशील शेतकरी अनिलशेठ शहा ग्रामपंचायतीचे सदस्य धैर्यशील राजेनिंबाळकर,राहुल आगम,संजय साळवे,महिला सदस्या अश्विनी खोमणे,सारिका खोमणे सामाजिक कार्यकर्ते सतिश साळवे,चेतन साळवे,नंदुशेठ जाधव,बारामती शिवसेना विभाग प्रमुख निलेश मदने,नितिन गायकवाड,सचिन साठे,दादा निंबाळकर,नाना खोमणे सर,युवानेते किशोर(भाऊ)आगम, पांडुरंग पवार व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९५७ च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले.अशाच पहील्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करुन सोडणारे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्मृती दिना निमित्त त्याच्या पवित्र स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे कार्य समाजात तळा गळा पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पै.नानासाहेब मदने अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.