महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर) :
इंदापूर , बारामती व पुरंदर तालुक्यात कोरोनाने कहर माजविल्यानंतर जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेताच जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी या तिन्ही तालुक्याचा दौरा आखला आहे . २२ ऑगस्ट रोजी दिवसभरात ते तिन्हीही तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटर व प्रतिबंधीत क्षेत्रांची पाहणी करणार आहेत . त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेही असणार आहेत .
जिल्हाधिकारी देशमुख यांच्या दौराची सुरूवात इंदापूर येथून होणार आहे . इंदापूर येथील कोव्हिड केअर सेंटरची ते पाहणी करणार असून तालुक्यातील कोरोना रूग्णांची स्थिती , त्यांना मिळणारे सुविधा यांची ते पाहणी करणार आहेत यानंतर ते तालुक्यातील सणसर येथे भेट देणार असून तेथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्र तसेच कोरोना संशयितांची काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची पध्दत व पायाभूत सुविधा यांची माहिती घेणार आहेत .
यानंतर ते बारामती व पुरंदर तालुक्यात जाणार असून , तेथेही ते कोरोनावरील नियंत्रण व त्यासाठीच्या उपाययोजना यांची माहिती घेणार आहेत .