जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांचे अवाहन
कराड : महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजे, त्याचबरोबर महापुरुषांचे त्यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
पाडळी, (केसे) ता. कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दिलीप महाजन बोलत होते.
यावेळी महाजन म्हणाले, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ढोल-ताशे वाजवून जयंत्या साजर्या केल्या जातात अशाही केल्या पाहिजेत परंतु हे करत असताना महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन चालनेही गरजेचे आहे. हे तरुणांनी समजून घेतली पाहिजे.
स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी केले तर आभार स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमास आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पुजारी, आदर्शमाता प्रतिष्ठान चे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, अजिंक्य महिला मंडळाच्या अध्यक्षा जुबेदा मुजावर उपस्थित होते.






















