महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा
महाबळेश्वर पर्यटन स्थळ पर्यटनासाठी संपुर्ण पणे सुरू होण्याआधी महाबळेश्वर मधील आरोग्यव्यवस्था ही भक्कम व्हावी यासाठी लवकरात लवकर व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड कोव्हीड आणि नॉन कोव्हीड दोन्ही ही प्रकारच्या रुग्णांसाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावेत अशी मागणी मनविसे चे तालुका अध्यक्ष ओंकार पवार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक मामा शिंदे , राजेंद्र पवार , आप्पा शिंगरे , तसेच मनविसेचे प्रथमेश शिंदे , गुरू सुतार , आशितोष मोहिते,विजय पवार हे उपस्थित होते.