महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (लोणीभापकर)
पळशी येथे दि ९ रोजी पडलेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले,पावसामुळे पिकांचे नुकसान झाले,तसेच घरांची पडझड झाली. परिसरातील तलाव, नाले पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच काही शेतकऱ्यांचे शेतात असणारी माती वाहून गेली,काहींचे शेताचे बांध फुटले.
ओढ्याचे असणारे बांध फुटुन शेतात पाणी शिरले त्यामुळे शेतातील माती वाहुन गेली. लोणीभापकर परिसरातील मासाळवाडी, कानाडवाडी, वाकी, मोराळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. फोटोओळी : ओढ्याचा बांध फुटल्यामुळे विठठ्ल करे यांच्या शेतात शिरलेले पाणी




















