कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको.कराड येथे उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे परंतु चार दिवस उपोषण करून ही मागण्या मान्य न झाल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरती प्रहार व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.