फलटण प्रतिनिधी :- गोविंद डेअरी धूळदेव येथे दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना समोर आली आहे या चोरीमध्ये सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद दूध डेअरी शेजारी धुळदेव याठिकाणी सौ.दीपाली गणपत शेडगे यांच्या घराचे कुलूप तोडून दिनाक 4 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या व त्यांची मुलगी कॉलेज ला गेली होती. मुलगी कॉलेज वरून दुपारी 2.30 च्या सुमारास घरी आली तेव्हा मुलीच्या लक्षात अस आले की घरचा सेफ्टी दरवाजा कोणीतरी तोडला आहे हे मुलीला समजताच तीने आईला फोन करून सांगितले की आपल्या घराचा दरवाजा कोणीतरी तोडला आहे व साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.
यानंतर फिर्यादी दीपाली शेडगे या घरी आल्या असता कोणीतरी अज्ञान व्यक्तीने सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून बेडरूम मधे असलेल्या कपाटामधून समान अस्ता व्यस्त करून त्यातील सोन्याच्या दोन अंगठ्या व मनीमंगळसूत्र व देव्हाऱ्याचा खाली ज्ञानेश्वरी मध्ये ठेवलेले 20 हजार रुपये असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले यानंतर फिर्यादी दीपाली शेडगे यांनी याबाबत अज्ञान व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.