धनंजय धुमाळ यांनी विद्यार्थांना योगविषयक मार्गदर्शन केले.
योग हे एक शिक्षण आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर योगसाधनेचे महत्त्व आता जगाला कळले आहे. या पार्श्वभूमीवर झयत्तेनुसार विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश होण्याची गरज आहे असे प्रतिपादन योगाभ्यासक तथा शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन धनंजय धुमाळ यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने वाघोली ता कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे भारत विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालय येथे योगाभ्यासक धनंजय धुमाळ यांनी विद्यार्थांना योगविषयक मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यासोबत योग प्रात्यक्षिके करून मार्गदर्शन केले.सध्याच्या धकाधकीच्या काळात शारिरीक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ राहणे आवश्यक आहे.त्यासाठी विद्यार्थ्यी दशेपासून विद्यार्थ्यानी योगाचा अंगिकार केल्यास शरीर निरोगी व मन संपन्न व विचारी होण्यास मदत होईल असे ते म्हणाले. दरम्यान योगाचे महत्व केवळ योगदिनाचे औचित्य साधून अधोरेखित न करता त्याचा प्रसार करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज धुमाळ यांनी व्यक्त केली.