दहिवडी : ता.०६
मार्डी येथील श्री सदाशिवराव विकास सेवा सोसायटी लि.मार्डी या सोसायटीच्या माध्यमातून मार्डी येथील शिवाजी दशरथ पोळ या शेतकऱ्याच्या बोगस पीक पाहणीची तपासणी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
सोसायटीकडून प्रांताधिकार्यांना देण्यात आलेल्या पत्राचा असे म्हटले आहे की,आमच्या संस्थेचे सभासद शिवाजी दशरथ पोळ, वर्षा शिवाजी पोळ, प्राची शिवाजी पोळ, सानिका शिवाजी पोळ यांनी आपल्या शेत जमिनीमध्ये डाळिंब पिकाची खोटी व बोगस पीक पाहणी सातबाऱ्यायावर करून पीक कर्ज मागणी केली आहे. सदर शेत जमिनीची खरी व वास्तवादी पीक पाहणी नाही. संस्थेला फसवण्याच्या हेतूने बोगस पीक पाहणी करून सदर सभासदांनी पीक कर्जाची मागणी केली आहे. कर्ज न दिल्यास संस्थेच्या संचालक मंडळाच्या विरुद्ध खोट्या तक्रारी करून संस्थेची व संचालक मंडळाची मानसिक, मानहानी बदनामी करत आहेत. वरीलपैकी वर्षा शिवाजी पोळी या संस्थेच्या विद्यमान संचालक आहेत व त्यासुद्धा यामध्ये सामील असल्याचा आरोप सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या सभासदांनी संस्थेकडे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्ज मागणी केली असता त्यांच्या शेतजमिनीत जाऊन बँकेची विभागीय विकास अधिकारी श्री. शिंगाडे, मार्डी शाखा विकास अधिकारी श्री. घाडगे, संस्थेचे चेअरमन व सचिव यांनी सदर क्षेत्रावर पाहणी केली असता त्यांनी मागणी केलेल्या व सातबारा उताऱ्यावर असणाऱ्या तसेच अस्तित्वात असणाऱ्या पिकाचा ताळमेळ बसत नाही. याचाच अर्थ त्यांनी काही ठिकाणी डाळिंब पीक नसताना व पोट खराब क्षेत्रावर बोगस पीक पाहणी केली आहे. तसेच दुसऱ्याच्या शेजारी शेतकऱ्यांच्या बागा दाखवून संस्थेची दिशाभूल करून बोगस पीक कर्ज मिळवण्याचा या सभासदांचा इरादा आहे. कर्जामधील या संस्थेला वेठीस धरून बोगस तक्रारी करणे, निवेदने देणे, संस्थेची बदनामी करणे असे प्रकार ते करत असल्याचा आरोपी सोसायटीच्या माध्यमातून प्रांतांना दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
त्यामुळे संस्थेची फसवणूक टाळण्यासाठी आपल्याकडून वरील शेतकऱ्याची पिक पाहण्याची वास्तववादी तपासणी व्हावी व दोषीवर योग्य ती कारवाई व्हावी, तसेच संस्थेस न्याय देण्याची मागणी ही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
![<em>शेतकऱ्याच्या बोगस पीक पाहणी तपासणीची मार्डी सोसायटीची प्रांतांकडे मागणी</em>](https://i0.wp.com/mahanewsnet.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240506-WA0007.jpg?fit=908%2C1280&ssl=1)