पूर हानी व अतिवृष्टी ची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावी – विक्रमबाबा पाटणकर
पाटण:- सन २०२१ मध्ये १५ जून व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात भुसस्खलन झाले होते. त्यामुळे अनेक ओढे, नाले , ओघळ मधून दगड गोटे व झाडे – झुडपे ५ ते १० फुट उंच वाहत भरून आल्यामुळे ओढे व नाले यांनी त्यांची प्रवाह बदलला आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही पात्रे जाऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अद्याप फुटकी कवडी सुद्धा मिळालेली नाही. अशा परस्थितीत पाटण तालुक्यातील पूर हानी व अतिवृष्टीची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावी अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. या प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हणले आहे मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या शेतकऱ्यांसमोर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे याही वर्षी शेतकऱ्यांवर हे आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर शासकीय यंत्रणेमार्फत सदरचे ओढे, नाले व नद्या यांचे खोलीकरण करून भूस्खलननामुळे भरलेला प्रवाह मोकळा करावा. अन्यथा शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीचे सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व शासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी स्वीकारावी. व शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची हमी शेतकऱ्यांना द्यावी. अशी मागणी या पत्रकाव्दारे सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी केली आहे.






























