महाराष्ट्र न्यूज मुळगाव प्रतिनिधी :
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस तथा सीआरपीसी’च्या जिल्हा सचिवपदी अनिल वीर यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र सचिव वैभव गिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली. तेव्हा वीर यांच्या निवडीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष निवृत्ती रोकडे होते.
यावेळी सहसचिव उत्तम सावंत,विधी सल्लागार ऍड. एच. एस. धुमाळ,प.महाराष्ट्र कार्याध्यक्ष ऍड. दयानंद माने, मनोहर सावंत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक /शिक्षेकेतर कर्मचारी संघटनेचे राजाध्यक्ष सुरेश रोकडे व इतर सहकारी उपस्थित होते.यावेळी माजी सैनिक व एक रेजिमेंट’चे सेवानिवृत्त जवान यांच्यासमवेत वैभव गिते,जिल्हाध्यक्ष निवृत्ती रोकडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हयातील सामाजिक स्थितीबाबत चर्चा करून वैभव गिते यांनी मार्गदर्शन केले.सीआरपीसी’चे नवनिर्वाचित जिल्हा सचिव अनिल वीर यांनी स्वागत केले.ऍड.हौसेराव धुमाळ यांनी आभारप्रदर्शन केले अनिल वीर यांच्या निवडीबद्धल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.