कराड; कराड तालुका वारूंजी येथे महिलेसह दोन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुशिला सुनिल शिंदे (वय 35) व विराज निवास गायकवाड (2 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी खून करून पसार झालेल्या अरविंद सुरवसे संशयिताचा तपास पोलिस करत आहेत.
सुशिला शिंदे आपल्या आईसमवेत विमानतळ येथे राहत होते. त्यांच्यासोबत बहिणीचा (दोन वर्षाचा) मुलगा विराजही राहत होता. त्याला घेवून सुशिला शनिवारी घराबाहेर पडल्या. पुन्हा घरी न आल्यामुळे शनिवारी दिवसभर त्यांचा शोध घेवूनही त्या सापडल्या नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता. पोलिसांना अरविंद सोबत सुशिला व विराज गेल्याचे माहिती मिळाली. पोलिसांनी त्या बाबत गुन्हा नोंदवला. तपास सुरू असतानाच वारूंजी येथील एका पतसंस्थेपासून आत गेलेल्या रस्त्यापासूनही शेवटच्या टोकाला निकम यांच्या घरात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिस उपाध्यक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर व त्याच्या सहकाऱ्यांनी घटणास्थळी भेट दिली. त्यावेळी ते मृतदेह सुशिला व विराज यांचे असल्याची स्पष्ट झाले. सुशिला व अरविंद हे मित्र होते. शनिवारी ते घरुन येथेच आले असावेत, असा अंदाज पोलिस निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला. संशयिताच्या तपासासाठी पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास सुरु आहे.
































