महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(लोणीभापकर)
कोरोना महामारी आणि येणारा काळा भयंकर आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड जाणार आहे त्यासाठी बारामती तालुक्यातील जिरायती भागातील पहिले कोविड सेंटर लोणी भापकर गावामध्ये उभारण्यात यावे. ही काळाची गरज आहे.
या सेंटर साठी प्राथमिक शाळा ताब्यात घेऊन तिथे कोरोना ची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर यांच्या देखरेखीखाली विलगीकरन करून गावातच उपचार करता येईल.व गावातील रुग्ण गावातील कोविड सेंटर मध्ये बरे होतील.हे सेंटर उभारण्यासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था,स्थानिक खाजगी डॉक्टर यांच्या मदतीने सहज शक्य आहे.यासाठी गरज आहे ती सर्वांनी पुढे येऊन काम करण्याची असे मतअखिल भारतीय मानवी हक्क संघटना( दिल्ली) बारामती शाखा अध्यक्ष मुनिर तांबोळी यांनी मांडले आहे.