महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(सातारा)
रहिमतपूर येथील सुनिल भैया युवा मंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल माने यांचे खंदे समर्थक गणेश चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रहिमतपूर नगरपरिषद , रहिमतपूर प्राथमिक ,आरोग्य केंद्र व सर्कल अधिकारी व तलाठी कार्यालय येथे मास्क व सेन्सर सॅनिटायझर मशिन प्रदान करण्यात आल्या.
युवा नेते गणेश चव्हाण यांचा वाढदिवस दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो . यावर्षी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेश चव्हाण मित्र परिवार आणि सुनिल भैय्या माने युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस अंत्यत साधेपणाने साजरा करून होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन रहिमतपूर शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत रहिमतपूर मधील सार्वजनिक व जनसपंर्क ठिकाणी, रहिमतपूरनगर परिषदेच्या कार्यालयात नगराध्यक्ष आनंदा कोरे मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम नगरसेवक विध्याधर बाजारे यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिकारी डॉ काकडे व कर्मचारी याच्याकडे तर सर्कल अधिकारी विनोद सावंत व तलाठी सदावर्ते आण्णा साहेब याच्याकडे मास्क व सेन्सर सॅनिटायझर मशिन प्रदान केल्या यावेळी गणेश चव्हाण सिद्धेश माने शुभम माने विशाल माने विकास जाधव प्रतिक कुदळे सुनिल भैय्या माने युवा मंच व रहिमतपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते .
गणेश चव्हाण मित्र परिवार व सुनिल भै य्या माने युवा मंचच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिक कौतुक करीत असून युवापिढीने यापुढील काळात याचा आदर्श घेऊन असेच वाढदिवस साजरे करावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत