लिंब . शैक्षणिक ज्ञानसाधनेच्या जोडीला विद्यार्थ्यांनी उद्योजकीय प्रशिक्षण घेतले तर ते त्यांच्या भविष्यातील उज्वल करिअरच्या दृष्टीने पूरक ठरते असे मत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी व्यक्त केले त्या गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब महाविघालय सातारा येथे तीन दिवसीय उद्योजक जागरूकता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर अॅङ योगेंद्र सातपुते प्राचार्य डॉ अजित कुलकर्णी उपप्राचार्य डॉ योगेश गुरव ङॉ राहुल जाधव डॉ संतोष बेल्हेकर प्रा धैर्यशील घाडगे प्रा माधुरी माहिते आदी प्रमुख उपस्थित होते
शीतल पाटील पुढे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेची कास धरून उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांगिण प्रगती आहे स्वताबरोबर इतरांचेही जीवन सुखकारक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याचे ध्येय ठेवावे
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले कि उद्योजकीय कौशल्य विद्यार्थ्यांनी प्राप्त करून घेण्यासाठी उद्योजकीय प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतला पाहिजे रोजगार निर्मिती करणारा घटक म्हणून आपण आपली वाटचाल केली पाहिजे त्याच स्वप्न व ध्येयपूर्तीसाठी आपण झगङले पाहिजे स्वताबरोबर इतरांची प्रगती करण्याचे सामर्थ्य फक्त उद्योग क्षेत्रातच आहे
प्राचार्य ङॉ अजित कुलकर्णी म्हणाले की उघोजकीय प्रशिक्षण व कैशल्य हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे स्वतःचा व्यवसाय उभा करताना घेतलेले प्रशिक्षण हे उपयुक्त ठरते उद्योग व्यवसायामध्ये तुमच्या क्षमतेला व गुणवत्तेला अधिक वाव आहे त्यामध्ये मान सन्मान व प्रतिष्ठा ही आहे
अॅङ योगेंद्र सातपुते म्हणाले कि प्रबळ इच्छाशक्ती तेथेच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडतो मनात जिद्द चिकाटी बरोबर अंगीभूत कौशल्य व कल्पकता असेल तर उत्तम उद्योजक घङू शकतो जीवनात ध्येयवादी असले पाहिजे इतरांपेक्षा आपण सर्वोत्तम कसे घडवू हाच ध्यास घेऊन वाटचाल केली पाहिजे
प्रारंभी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांचा महाविद्यालयातर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी गौरविले तीन दिवसीय उद्योजक जागरूकता कार्यशाळेत विविध विषयावरील परिसंवादमध्ये व्याख्याते वैशाली मंडपे सायबर सुरक्षा डिजिटल मार्केटिंग सुबोध अभ्यंकर नाबार्ङ योजना नितिराज साबळे सरकारी योजना सुनील शेटे उद्योजक जागरूकता हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत
चौकट. प्रशिक्षण कार्यशाळेत उद्योजकीय गुण उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास निवड बाजारपेठेची पाहणी प्रकल्प अहवाल उद्योगासाठी लागणारे आवश्यक परवाने व नोंदणी कर्जप्रकरणे तयार करण्याची प्रक्रिया व सादरीकरण बँकेची कार्यपद्धती संभाषण कौशल्य मुलाखत कौशल्य वेळेचे नियोजन परिकल्पकता याबाबतची सखोल माहिती विघार्थ्याना मिळाली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी इथापे प्राजक्ता कांबळे यांनी केले आभार डॉ संतोष बेल्हेकर यांनी मानले
उघोजकीय कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना शीतल पाटील समावेत अॅङ योगेंद्र सातपुते श्रीरंग काटेकर ङॉ अजित कुलकर्णी ङॉ योगेश गुरव