कराड : कराडकर अन्याय सहन करणार नाहीत, आपण कराडच्या जनतेचे सेवक आहात मालक नाही, पाणी पुरवठा योजनेला अचानक तोटा का झाला, असे प्रश्नार्थक फ्लेक्स लावून कराडकरांनी आज पहाटेच पालिकेच्या एकवेळ पाणी पुरवठ्याचा निषेध केला आहे. कराडला चौका चौकात निषेधाचे फ्लेक्स झळकले आहेत.
शाहू, दत्त चौकासह शहरातील चौका चौकात लावलेल्या फ्लेक्सची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कराडला चौदा वर्षापासून चोवीस तास पाणी योजना गाजते आहे. त्या पाणी पुरवठा योजनेचा पत्ता नाही. तोच पालिकेने एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा आगळ्या वेगऴ्या पद्धतीने कराडात आज पहाटे निषेध करण्यात आला.
तोटा भरून काढण्यासाठी कराड पालिकेचा फतवा; नागरिकांना केवळ एकवेळ पाणी…
कराडकर साखर झोपेत असतानाच शहरातील चौका चौकातील फ्लेक्सने साऱ्यांचे लक्ष वेधले. आपण कराडचे सेवक आहात मालक नाही, अन्यायकारक निर्णय कराडकर सहन करणार नाहीत, पाणी पुरवठा योजना अचानक तोट्यात का गेली, त्याचा निषेध करत एक सुज्ञ नागरीक म्हणून गांधीगिरी स्टालाईने निषेध केला.