महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(वाठार)
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वाठार स्टेशन येथे गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळून हे कार्यक्रम करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले यावेळी गोरगरीब लोकांना फळे वाटप करत असताना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते गोरगरिबांना फळे वाटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आनंद दिसून येत होता.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, कोरेगाव तालुका उपाध्यक्ष राजेश काळोखे, हिंदू एकता विभाग प्रमुख ज्ञानेश्वर लोंढे, हिंदू एकता अध्यक्ष मंगेश शितोळे, धर्मेंद्र निंबाळकर, उद्योजक यशवंत पवार, युवा नेते अभिजित जाधव, गणेश लोंढे, सचिन जाधव, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.






















