नवारस्ता प्रतिनिधी : शिवांजली शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, नाडे येथे नवागतांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
सुसंस्कृत शिक्षणातून ग्रामीण विकास हे ब्रीदवाक्य असणाऱ्या शिवांजली शिक्षण संस्थेने भारतीय संस्कृती जपत भारतीय संस्कृती प्रमाणे विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप करून व वृक्षारोपण करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शाळेबद्दल असलेले मत चिमुकल्या शब्दात व्यक्त केले.
या स्वागत समारंभावेळी सौ. पाटील. यांनी सुत्रसंचालन केले तर सौ. पुजारी यांनी आभार मानले.

शाळेच्या संचालक मंडळाचे सदस्य श्री सयाजी माथणे यांनी नवागतांना मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य श्री सयाजी माथणे, मुख्याध्यापक श्री. यादव एस. के., उपमुख्याध्यापिका सौ. बांदल, पर्यवेक्षिका सौ. कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.






















