महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(पाचगणी)
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदे च्या उपाध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार याबाबत पांचगणी करांमध्ये उत्सुकता लागून राहिली असून या निवडीसाठी दि १८/०९/२०२० रोजी पाचगणी नगरपरिषद कार्यालयात ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी दिली.
६ जुलै रोजी उपनगराध्यक्ष अनिल वन्ने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर कोरोना संकट उधभवल्याने या निवडीचा रेंगाळल्या होत्या. त्यामुळे१८/०९/२०२० शुक्रवारी सकाळी १२ वाजता नव्या उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी पालिकेत ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा आयोजित केली आहे. नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यादाच अशा प्रकारे निवड होणार आहे.

पांचगणी नागरपालिकेवर जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे वर्चस्व असले तरी त्यांचेकडे चार नगरसेवक असून विरोधी गटाकडे १३ नगरसेवक असे बलाबल आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपद हे यापूर्वी विरोधी आघाडीकडे आहे. आणि यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नगरपालिकेचा क्रमांक घसरल्याने पालिका क्षेत्रात अध्यक्ष गटाला विरोधकांनी टार्गेट केले होते. त्यामुळे आता रिक्त झालेल्या या जागेवर कोण उपनगराध्यक्ष होणार याची उत्सुकता पांचगणी कराना लागूनच राहिली आहे.






















