महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी /फलटण : फलटणमधील हॉटेल आर्यमान येथे लॉकडाऊन कालावधीमध्ये गेले २ महिने चालू असलेल्या अन्नछत्र कार्यक्रमाचा समारोप आज झाला.
या प्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सचिनभैया सूर्यवंशी बेडके, जेष्ठ नेते शिवाजीराव फडतरे, युवा नेते महेंद्र सूर्यवंशी बेडके, सामाजिक कार्यकर्ते अमिर भाई शेख, बजरंग गावडे, प्रितम जगदाळे, पंकज पवार, सोपान जाधव, खंडेराव सरक, विजय कुमार भोसले, मेजर सावंत, प्रदीप बार्शीकर, ऋषिकेश बिचुकले, शंकर कदम, अतुल पवार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थतीत होते. या प्रसंगी सचिनभैया सूर्यवंशी बेडके यांनी या अन्नछत्रा साठी लागणाऱ्या ज्या लोकांनी मोलाचे सहकार्य केले योगदान दिले, त्या सर्वांचे आभार मानले व भविष्यामध्ये तालुक्यातील गोर गरीब लोकांना नोकरी व्यवसाय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देन्यात आले.





















