महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती
बारामती शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता सरकारी रुग्णालये सुद्धा अपुरी पडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने खाजगी रुग्णालयातील काही बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करून त्यांना काही निर्देश देऊन प्रत्येक दिवसाची रक्कम ठरवून दिलेली आहे. असे असतानाही ठरवून दिलेल्या रकमेच्या अधिक बिले देऊन लाखोंची बिले वसूल केली जात आहे.
रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक असल्यामुळे प्रशासनाने शहर व तुलुक्यातील काही खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या उपचारासाठी मान्यता दिली आहे. या खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून सरकारी निर्देशानुसार अधिक बिले घेऊ नये असे सांगितले आहे. मात्र तरीही रुग्णांना अधिकची बिले लावण्यात येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी बिलासंदर्भात तक्रार करूनसुद्धा काहीही फरक पडत नसल्याने नाईलाजाने हि बिले भरावी लागत आहेत.