महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :सातारा
सातारा पोलिस दलातील पोलिस जवान राहुल कांबळे यांच्या दुचाकीला भरघाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारणे समोरून येऊन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली झालेल्या मृत्यूने सातारा पोलिस दलासह वाई शहरात शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राहुल गुलाबराव कांबळे वय.38 राहणार साकेवाडी आंबेडकर नगर वाई हे आपली दुचाकी क्रमांक एम एच.11. व्ही.1053 वरून ते वाई वरून नोकरीच्या ठिकाणी सातारा येथे जात असताना त्यांची दुचाकी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास नागेवाडी गावच्या हद्दीतील पोलिस मदत केंद्रा समोर आली असता सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच.12.एफ एफ.4541 वरील चालक अक्षय भोसले वय.27 राहणार बत्तीस शिराळे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुणे बाजूकडे जाणारी कार अचानक पणे रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या डीवाईडर वर चढून ती कार सातारा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन पोलिस जवान राहुल गुलाबराव कांबळे यांच्या दुचाकी वर जाऊन आदळून त्यांना दुचाकीसह तब्बल वीस फूट फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची खबर सातारा तालुका पोलिस स्टेशनला लागताच एडिशनल एस.पी समीर शेख PI एस.वि. हंगारे पोलिस उपनिरीक्षक ए.जी पाटील सहाय्यक फौजदार निवास मोरे व पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह आणि दुचाकी व स्विफ्ट कार ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला व अपघातग्रस्त दोन्ही वाहने सातारा तालुका पोलिस ठाण्यात जमा करण्यात आलि आहेत. मयत राहुल कांबळे यांच्या मृतदेहास सातारा पोलिस दलातर्फे बंदुकीतून हवेमध्ये तीन वेळा गोळ्या झाडून सलामी देण्यात आली. त्यांच्यावर शासकीय इतमामात वाई येथील साके वाडी येथे असणाऱ्या स्मशान भूमीत शोकाकूल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पित केली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेवार आणि वाई पोलीस ठाण्यासह सातारा तालुका पोलिस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्याच बरोबर राजकीय सहकार शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कुटुंबीयांन मधून होत असलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे अश्रूंचे बांध फुटताना दिसत होते