महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :मायणी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास सहा महिने मुदतवाढ देण्याचा महत्त्पूर्ण निर्णय सहकार व पणन , वस्त्रोद्योग मंत्रालयाने जाहीर केला आहे . बाबतचे आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी नुकतेच काढले आहेत . या कामी सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून संस्थेचे मार्गदर्शक , जि प . सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे समजते .
याबाबत ची अधिक माहिती अशी , वडूज बाजार समितीच्या संचालक मंडळाची विहित मुदत गुरुवार दि .१७ सप्टेंबर २०२० पर्यंत होती . त्याच्या अगोदर दोनच दिवस संस्थेच्या सभापती पदी गुदगे समर्थक शशिकांत देशमुख व उपसभापती पदी धारपुडीच्या पार्वती तुकाराम यादव यांची निवड झाली होती . कोरोना संसर्गजन्य आजारामुळे संस्थेची निवडणूक आता लगेच होणार नाही . त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ अथवा प्रशासकीय राजवट असे दोनच पर्याय होते . त्यातच दोन दिवसांपूर्वी मुदतवाढ मिळालेल्या बाजार समितीच्या यादीत वडूज बाजार समितीचे नाव नव्हते . त्यामुळे देशमुख , सौ . यादव यांची पदे औट घटकेची ठरणार का ? अशी चर्चा होती . मात्र सुरेंद्रदादांनी आपला नैसर्गिक चिकाटीचा गुण वापरून मंत्री बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून संस्थेला मुदतवाढ वाढवून आणली मुदतवाढ मिळाल्यामुळे सभापती उपसभापती सह संचालक मंडळाने सुटकेचा नि : श्वास टाकल्याची चर्चा आहे.





















