महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगाव
कोरेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, रुग्णालये विविध उपक्रमातून रुग्णांसाठी पुढे आले आहेत, गरजूंना मदत देणे हेच ध्येय सर्वांचे आहे. मात्र ४५ वर्षांपूर्वीच्या मित्रांचा एक ग्रुप मात्र नेहमीच कोरेगाव मध्ये काही वेगळे उपक्रम राबवून समाज मनावर घर निर्माण करतोय.
सरस्वती हायस्कूलच्या १९७५ सालच्या जुन्या ११ वी मधील हा ग्रुप अवघ्या व्हॉट्सप मेसेज वरून सहकारी मित्रांना आवाहन करीत कोरेगाव शहरातील कोरोना बाधितांना संजीवनी देण्यासाठी चक्क एका दिवसातच ऑक्सिजन मशीन खरेदी करून त्याचे कोरेगावकरांसाठी लोकार्पणही करतो याचं नवलच आहे.
सामाजिक जाणीवेतून गेली ४५ वर्षे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या या १९७५ च्या जुनी ११ वी ग्रुपने आजच्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी कोरेगावकरांसाठी दिलेल्या या उपयुक्त ऑक्सिजन मशीन बद्दल या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.