महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर) : शहाजीराजे भोसले
भोडणी येथे जिल्हा परिषद फंडातून बांधलेल्या सिद्धनाथ मंदिर सभामंडपाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शनिवारी ( दि.२६ ) नारळ फोडून करण्यात आले .
यावेळी बोलताना अंकिता पाटील यांनी सांगितले की , गावातील ज्येष्ठ नागरिक , युवक व महिला यांच्या सूचना विचारात घेऊन आपण विकासकामे करीत आहोत . भोडणी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून , निधी कमी पडू दिला जाणार नाही . यावेळी आजी , माजी सरपंच , पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते




















