सातारा : सातारा-मेढा रस्त्यावर कोंडवे गावच्या हद्दीत एका खाजगी कंपनीची ओ.फ.सी.केबल बेकायदेशीररित्या विनापरवानगी टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे.उपविभागीय अभियंता इनामदार यांना कोणते ‘ईनाम’ मिळाल्याने कारवाईचे दार बंद केले आहे असाच सवाल येथील जनतेतून उपस्थित केला जात असून वरीष्ठ अधिकारी तरी या बेकायदेशीर खोदकामाची दखल घेणार का? याकडे लक्ष लागले आहे. 31/10/2022 रोजी मोळाचा ओढा ते कोंडवे परिसरात सातारा मेढा रस्त्यावर संतोष इंजिनियरिंगचे प्रोप्रायटर भीमा राठोड यांच्यामार्फत बेकायदेशीरपणे ओ.फ.सी केबल टाकण्याचे काम सुरू होते.केबल टाकतेवेळी येथे करण्यात आलेले उत्खनन हे बेकायदेशीर असल्याची याबाबतची तक्रार शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी केली होती. परंतु तेथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कामावर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडून तीन दिवसानंतरही कोणतीही कारवाई केली नसल्याचे आढळून आले आहे. तक्रार देऊनही बेकायदेशीर सुरू असलेल्या कामावर तेथे वापरण्यात आलेल्या वाहनांवर त्यात प्रामुख्याने ट्रक क्रं.एम.एच42एफ6696,पाण्याचा टँकर ज्याचा क्रमांक एम.एच.12 ए.डब्ल्यू.6040 यासह पिकअप व पोकलेन या वाहनांसह खोदकाम करणारी मशीन अशा साहित्याचा वापर बेकायदेशीर खोदकाम करण्यासाठी आला होता. वापरण्यात आलेले साहित्य तात्काळ जप्त करून बेकायदेशीर केबल काढून टाकावी अशी मागणी केली होती. बेकायदेशीररित्या उत्खनन व खोदकाम करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी तक्रारीनंतर आलेल्या प्रोजेक्ट व्यवस्थापक यांनी पाठवलेले सिक्युरिटी गार्ड दोन दिवस फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तळ ठोकून घटनास्थळी उपस्थित होते.परंतु सातारा तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.उलट सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्याद नोंदवावी असा जावई शोध लावला होता आणि दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आले.