लोणी भापकर-प्रतिनिधी संजय कुंभार
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्याने लॉकडाऊनचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. कंपन्या बंद पडल्या, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, मजुरांच्या पोटा – पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तसेच गाव गाड्यातील अनेक मजुरांना स्वतःचा रोजगार गमवावा लागला त्यामुळे कुटुंबे कशी चालवावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अशा आपत्कालीन परिस्थितीत या गरजू कुटुंबांना आधार द्यावा म्हणून नामदेव गुलदगड यांनी सामाजिक बांधिलकी जपत मित्रांच्या सहाय्याने पळशी, मासाळवाडीतील ४० कुटुंबांना ६०० रुपये किमतीच्या किराणा मालाचे किट वाटप केले.
नामदेव गुलदगड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते असून सध्या मुंबईतील एका राष्ट्रीय संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून काम करत आहेत. त्यांचे शिक्षण बी. ए. (अर्थशास्त्र), एम.एस.डब्ल्यू., एल.एल.बी. असे झाले आहे. महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे ते विजेते आहेत.