काेरेगांव शहरासाठी अत्याधुनिक जम्बाे रुग्णवाहिकेचे लाेकार्पण
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी काेरेगांव :
ज्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदार म्हणून निवडूण दिले त्या माझ्या मायबाप जनतेचे लाेकसेवेतूनच समाजऋण व्यक्त करण्याची संधी मला मिळाल्याचे उद्गार आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
आमदार स्थानिक विकास निधीतून आमदार महेश शिंदे यांनी काेरेगांव नगरपंचायतीला दिलेल्या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त जम्बाे रुग्णवाहिकेचे लाेकार्पण आज बाजारमैदानावर झाले, त्यानंतर नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश शिंदे बाेलत हाेते.
ज्येष्ठ नेते सुनिल खत्री, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, नगराध्यक्षा रेश्मा काेकरे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, पाेलीस निरीक्षक सुनिल गाेडसे, मुख्याधिकारी विजया घाडगे, नगरसेवक महेश बर्गे, जयवंत पवार, सुनिल बर्गे, राहुल बर्गे, निवास मेरुकर, युवक अध्यक्ष राहुल बर्गे, माजी नगरसेवक राजेंद्र बर्गे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती.
यावेळी बाेलताना महेश शिंदे म्हणाले, काेराेनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या लढ्यात धैर्याने पुढे जाण्यासाठी काेरेगांव मतदारसंघात आपण माेठ्या ताकदीने प्रामाणिक प्रयत्न सुरु केले, त्यासाठी सर्व नगरसेवक, कार्यकर्ते पुढे आले आहेत. वाढती रुग्णसंख्या राेखण्यासाठी सर्वांना एक चांगला पण केला आहे. काेरेगांव शहरात सुसज्ज असे 100 बेडचे काेराेना केअर सेंटर उभे केले असून आणखी 100 बेडचे स्वतंत्र रुग्णालय उभे करीत आहाेत. त्यात 10 व्हेंटीलीटर सह 25 जम्बाे ऑक्जिनची यंत्रणाही येत्या दाेन दिवसात कार्यान्वित हाेत असल्याचे सांगून आमदार महेश शिंदे म्हणाले, काेराेना महामारीला सामाेरे जाताना काेणताही भेदभाव न करता, गटा तटाचा विचार न करता माणूसकीधर्म जपा, प्रत्येक गरजू रुग्णाला, नागरिकाला मदत करा. रुग्णालयापर्यंत पाेहाेचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रसंगी स्वत:चे वाहनच त्या नागरिकासाठी रुग्णवाहिका म्हणून उपलब्ध करुन द्या. प्रत्येकाने झाेकून देवून काम करा, तरच काेरेगांव काेराेना मुक्तीचा पॅटर्न निर्माण करु शकेल. प्रत्येक नगरसेवकाने हे आव्हान स्विकारुन आपापल्या प्रभागात स्वत:ची यंत्रणा उभी करा, प्रत्येक नागरिकाच्या आराेग्य तपासणीसाठी घराेघरी जावून माहिती घ्या. आपण करीत असलेले काम मी कधीही काेरेगांव शहरात येवून पाहणी करीन. काेरेगांव शहर काेराेनामुक्त करण्यासाठी आपल्याला आता माेठा संघर्ष करावा लागणार असल्याचेही आमदार महेश शिंदे यावेळी म्हणाले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी करुन, काेराेनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आमदार महेश शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात पायाला भिंगरी लावून निर्णायक काम करण्याचा सपाटा लावला आहे. लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी मतदारसंघात गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप, आर्थिक मदत यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रिक्षा चालक, प्रवासी वाहतुक करणाèया व्यवसायीकांना आर्थिक मदत देवून माेठा दिलासा दिला. मागेल त्याला सॅनिटायझर पुरविले. एवढ्यावर न थांबता मतदारसंघातील जनतेसाठी स्वखर्चातून 100 बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभे करुन जनतेतला आमदार काय असताे हे महाराष्ट्राला दाखवून दिल्याचे राजाभाऊ बर्गे म्हणाले.
यावेळी सुनिल खत्री, सूर्यकांत बर्गे, नगरसेवक महेश बर्गे यांनीही मनाेगत व्यक्त केले.
नगराध्यक्षा रेश्मा काेकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी पाेलीस उपनिरीक्षक विशाल कदम, व्यापारी संघटनेचे प्रमुख सुरेश कुलकर्णी, सागर दाेशी, राजेश दायमा, पंचायत समितीचे माजी सदस्य रविंद्र बाेतालजी, उज्वला निकम, श्रीकांत बर्गे, महेश बर्गे, संताेष बर्गे, संजय बर्गे, राजेंद्र कुंभार, अजय बर्गे, राजेश बर्गे, रामभाऊ देवकर, संजय दुबळे, अक्षय बर्गे, मंदार बर्गे, रितेश बर्गे, प्रितम बर्गे, संताेष कदम, विलास जाधव, रमेश उबाळे, वसिम इनामदार, किशाेर चिनके, अजित पवार, राजु रसाळ, साेमनाथ शिंदे, नगरपंचायतीचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब सावंत, अभियंता काकडे, धनंजय भुजबळ यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी, नागरिक उपस्थित हाेते.
“चमकाेगिरी नकाे प्रत्यक्ष काम करा“
काेरेगांव शहरात काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने कार्यकर्ता बनून प्रत्येक नागरिकाची आराेग्य तपासणी करावी त्यासाठी उद्यापासूनच टाक्स ाेर्स तयार करा, मी प्रत्यक्ष कुठल्याही प्रभागात जावून माहिती घेईन, केवळ कामाची प्रसिध्दी करण्यासाठी चमकाेगिरी न करता प्रत्यक्ष काम करुन दाखवा असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
काेरेगांव पॅटर्न महाराष्ट्रात नावाजेल
काेराेना मुक्तीसाठी काेरेगांव शहरात लाेकाेपयाेगी कार्यक्रम राबवून सर्वच प्रभागात अतिशय दिशादर्शक काम सुरु आहे. त्यामध्ये आदर्श नगरसेवक असणाèया महेश बर्गे यांचे काम अतिशय उल्लेखनिय असून भविष्यात काेराेना मुक्तीचा काेरेगांव पॅटर्न महाराष्ट्रात नावाजला जाईल असेही आमदार महेश शिंदे म्हणाले.