महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर): शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड १९ विनिलीकरन सेंटरच्या धर्तीवर तावशी येथे लवकरच कोव्हिड १९ विलगीकरण सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सरपंच लालासो सपकळ यांनी दैनिक महाराष्ट्र न्यूज, इंदापूर तालुका प्रतिनिधींशी बोलताना सांगितले .
यासंदर्भात तावशी ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाचे अधिकारी व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच लालासो सपकळ, सदस्य तुषार मंडलिक , पै.प्रविण पानसरे आदींच्या उपस्थितीत विशेष सभा घेऊन, त्यामध्ये कोव्हिड १९ विलगीकरण सेंटर सुरू करण्याबाबत मंजुरी घेण्यात आली आहे .