महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
संपूर्ण देशासह राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर थैमान माजवले असून दिवसागणिक कोरोना रुग्ण गाव पातळीवर सुध्दा वाढू लागले असल्यामुळे साखरवाडी सारख्या तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेच्या गावांमध्ये कोरणा रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून बऱ्याच रुग्णांना उपचारासाठी लोणंद , फलटण व बारामती या ठिकाणी जायला लागत असून या गोष्टीची दखल घेऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने व श्री दत्त इंडिया कारखान्याचे संचालक जितेंद्र धारू व रुपारेल कुटुंब यांच्या सहकार्याने कारखान्याच्या माध्यमातून श्री दत्त फाउंडेशन याची स्थापना केली असून याच माध्यमातून कारखान्याच्या रिक्रिएशन क्लब च्या इमारतीमध्ये सुसज्ज असे ६५बेडचे आयसोलेशन कोविड सेंटर करण्याचे योजिले असून याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून भविष्यात कारखान्याच्या बंद पडलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असून या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप व सिव्हील विभागाचे इनचार्ज राजेंद्र भोसले व फलटण तालुका साखर कामगार युनियन यांनी दिली.