कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर कोरोनाने पछाडले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / दहिवडी :
गेल्या सात महिन्यांपासून म्हसवड व पालिका हद्दीत कोरोना या महामारीला म्हसवड मधून हद्द पार करण्यासाठी म्हसवड पालिकेच्या स्वच्छता विभागाध्यक्षा कर्मचारी वर्गानी एक दिवस हि सुट्टी न घेता शहर कोरोनापासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्ह्यातच संख्या वाढल्याने म्हसवडची हि संख्या एकीकडे वाढती गेली तर दुसरीकडे मृत्यूदर हि वाढत गेला या मृतांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हसवड पालिकेने एक पाच कर्मचारी यांची टिम तयार केली होती या टिम मधील पालिकेचे कायमस्वरुपी कामगार विनोद शामराव सरतापे यांनी परवा पर्यत २३ कोरोना पॉझिटिव्ह मृत देहाचा विधी माणगंगा नदी पात्रात केला आणि विनोदला केव्हा या महामारीने घेरले हेच या कोरोना योध्द्याला उमगले नाही आणि या योध्द्याचा सोमवारी रात्री १० वाजता निधन झाले सर्वांना धक्कादायक या घटनेने सर्वात्र हळहळ व्यक्त होती आहे
लहान वयात आई वडिलांचे छत्र हरवले मोठ्या बहिणीने लहाणाची मोठी तिन भावंडे केली विनोद सरतापे याला पालिकेने आईच्या जागेवर कामावर घेतले हळवा स्वभाव, मृद भाषा कोणी हि काम सांगा सर्वाचे काम करणारा , जवाबदारी ने काम करणारा कर्मचारी म्हणून विनोदकडे पाहिले जात होते कासी दिवस अग्नीशमन गाडीवर काम केल्या नंतर मार्च मध्ये सुरु झालेली हि कोरोना वायरसची महामारीत म्हसवड व परिसरातील आणि म्हसवड पोलिस स्टेशन हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले तर पालिकेने त्याचा अंत्यसंसकार करण्याचा जिल्हाधिकारी यांंनी आदेश काढल्यावर मार्च २०२० पासुन आज पर्यत २३ कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या मृत देहांना अग्नी देण्याचे काम म्हसवड पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कोरोना योध्द्यानी दिवस रात्र रविवार सुट्टीचा दिवस न पहाता केवळ माणुसकीच्या नात्याने काम करणाऱ्या या कोरोना योध्द्यांच्या टिम मधील विनोद सरतापे या यौध्द्य्याचे निधन २८ / ०९/२०२० सोमवारी रोजी रात्री १० च्या दरम्यान झाले
या योध्द्याच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केले तर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांनी दुःखं व्यक्त करत विनोद सरतापे यांना शासनातर्फे जी मदत देता येईल त्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले . यावेळी युवराज सुर्यवंशी,सागर सरतापे ,दादा सरतापे, गणेश चव्हाण, राजेश चव्हाण, समीर सरतापे , अरुण सरतापे, शरद वाघमारे, विजय लोखंडे या कोरोना योध्द्यांच्या टिमने श्रध्दांजली वाहीली