पोलादपूर तालुक्यातील साखर देऊळकोंड येथे सुराज्य युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि संकलक सुनीलकुमार सोळंके (औरंगाबाद ) यांचे ‘नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची अमरकथा’ या विषयावर सोमवार, दिनांक २१ मार्च शिवजयंती दिनी व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी सुनीलकुमार सोळंके यांना ‘सुभेदार तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार’, उद्योजक आणि शिवप्रेमी सतीशदादा शिंदे यांना ‘सुभेदार सूर्याजी मालुसरे शौर्य पुरस्कार’ तर कोरोना काळात पोलादपूर तालुकावासीयांची निष्काम भावनेने आरोग्य सेवा केल्याबद्दल डॉ गुलाबराव सोनावणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पोलादपूर तालुका अंतर्गत इयत्ता ५ ,६ ७ साठी पाणी वाचावा, एक पाऊल स्वच्छतेकडे तर ८,० ९ वी साठी देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, शिवचरित्रातील प्रभावी घटना या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सुनील – ८६६८५२४९६३ यावर संपर्क साधावा.

सायंकाळी ७ वाजता शिवशंभो मित्रमंडळ – महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक पार्टे कोंड येथे सोळंके यांचे ‘शिवचरित्राचा शोध आणि बोध’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. पोलादपूर आणि महाड तालुक्यातील शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जितेंद्र तानाजी मालुसरे यांनी केले आहे.





























