महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : रेल्वे च्या नवीन धोरणा नुसार सर्व रेल्वे गेट बंद करुण त्या ठिकाणी भूयारी अथवा उड्डान पूल करण्याचे काम सुरु आहेत। कोपर्डे हवेली,पार्ले, वडोली निलेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे चे स्वयंचालित गेट होते ते बंद केले आहे व त्याठिकानी भूयारीमार्ग पुलाचे करण्यात येत आहे। सदर पुल जमिनीपासुन साधारण विस फुट खोल असल्याने पुलामध्ये पाणी साचत आहे। सदर पाणी रेल्वे विभागाणे कायम स्वरूपी काढून देण्याची व्यवस्था करावी व रेल्वे च्या दोन्ही बाजुचे रस्ते भूयारी मार्गाला जोड़ावे या मागणीचे पत्र रयत क्रांतिचे सचिन नलवड़े व ग्रामपंचायत पार्ले च्या वतीने एस के सिंग उप कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे यांना देण्यात आले होते। यावेळी साठलेले पाणी कायमस्वरूपी काढण्यासाठी पाईपलाइन करण्यात येणार असून रस्ते करण्यासाठी निधिची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते। रेल्वे भूयारी मार्गातील पाणी कायमस्वरूपी न काढल्यास भूयारी मार्गाचा वाहतुकीसाठी व लोकांना पायी ये जा करण्यासाठी भविष्यात कोणताही वापर करता येणार नाही
साठलेल्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी सचिन नलवड़े व ग्रामस्थ यांनी दोन वेळा काम बंद पाड़ले होते यावेळी रेल्वे चे चीफ इंजीनियरिंग सक्सेना यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती परंतु गेल्या पंधरा विस् दिवसात दिलेल्या आश्वासना संदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने उत्तर पार्ले,पार्ले वडोली निलेश्वर येथील शेतकरी नेते सचिन नलवड़े व पार्ले ग्रामस्थ यांच्या वतीने कराड येथील रेल्वे पोलीस स्टेशन यांना रेल रोको करण्या बाबतचा ईशारा देण्यात आला आहे। निवेदन देताना रेल्वे चे अधिकर्यांशी फोन वरुण चर्च्या होवून येत्या दोन दिवसात पाणी काढून काम सुरु करणार असल्याचे सांगितले