महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / दहिवडी
महाराष्टातील शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहे. सरकार मात्र सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेत नाही. वारंवार अन्याय सहन करावा लागत आहे. न्याय मिळणार कधी असा सवाल निर्माण होत आहे. कमीत कमी शेतकरी आणि कामगार यांच्याविरोधी असणारे काळे कायदे तरी रद्द करा. देशात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे मागासवर्गीय वाल्मिकी समाजातील मुलीवर बलात्कार करून हत्या केली.
एवढ्या वाईट समाजाला काळिमा फासणाऱ्या घटना घडूनही योगी सरकार मात्र कोणतेही कठोर पाऊल उचलत नाही. योगी सरकार हे निर्लज्ज सरकार आहे त्यांचा धिक्कार असो अशा घोषणा ही माण तालुका काँग्रेस कार्यकर्ते यांनी दिल्या. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी त्या ठिकाणी गेले असता त्यांनाही त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली आणि उलट त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याना अटक करण्यात आली.

हे सर्व घटनेतच्या निषेधार्थ आज माण तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने माण तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आलें यावेळी माण तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष एम के भोसले भाऊ, मा. अध्यक्ष प्रा. विश्व्भर बाबर सर, dr. सागर सावंत, मा. जिल्हा परिषद सदस्य. दादासाहेब काळे, निलेश काटे, योगेश भोसले, नकुसाताई जाधव, बाळासाहेब गोंजा री अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते





































