
श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव येथे रविवार दि.६ मार्च २०२२रोजी श्री अविराज पवार यांच्या सहकार्याने एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळात २१ व्या शतकात मनुष्याचे जिवन गतिमान होत असताना काळानुरूप राहणीमान व आहारामध्ये प्रचंड बदल दिसून येत आहे.दिवसभर आपण सर्वजन विविध क्षेत्रात वावरत असताना आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो का हा प्रश्न मनाला विचारुन पहा समाजातील प्रत्येक व्यक्तीला शारीरिक देखभाल ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.समाजासोबतच अध्यात्मिक क्षेत्रातील संत साधकांचे आरोग्य सुध्दा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे.या अनुषंगाने महानुभाव पंथाच्या धर्मप्रचारासाठी अग्रेसर असलेले विद्यापीठ म्हणजेच श्रीब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव संस्था.या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य महंत श्रीराहेरकरबाबाजी व्यासपीठावर उपस्थित होते.लोकशाही संघर्ष संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक श्री अतुल नांगरे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रथमता उपस्थित मान्यवरांचे आचार्य श्रीबाबाजींच्या शुभहस्ते शुभचिंतनरुप सत्कार करण्यात आला .व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आश्रमातील साधकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मुळव्याध,ह्दयविकार,थायरॉइड, पँरेलेसिस,किडणी प्रामुख्याने अशा आजारांवर कमीत कमी खर्चामध्ये उपचार होण्यासाठी व पाच ते सहा महिन्यात आजारांवर मात करण्यासाठी डॉ. संभाजी गिरी न्यूट्रेशन एक्स्पर्ट,सिल्वर डायरेक्टर श्री. सुदर्शन अल्लडवाड गोल्ड डायरेक्टर श्री अजित पवार सिल्वर डायरेक्टर श्री.व्ही. एस.राठोड स्टार डायरेक्टर श्री अविराज पवार स्टार डायरेक्ट नांदेड येथील टीम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आचार्य श्रीगुरुवर्य बाबाजींचे अध्यक्षीय विचारातून दुवा व दवा दोन्हींचा समन्वय साधणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन केले.या प्रसंगी श्री योगीराजदादा राहेरकर यांनी प्रास्ताविक सादर केले तसेच श्रीब्रह्मविद्या पाठशाळा संस्थेचे जेष्ठ साधक मुरलीधरदादा राहेरकर व युगंधरदादा राहेरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री अविराज पवार, यांच्या सहकार्यातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.






















