महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, महाराष्ट्र राज्य पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हाप्रमुख कुलदीप क्षिरसागर यांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मौजे चिखली ता. कराड येथील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यमान सरपंच सौ. प्रतिभा कृष्णत सावंत, उपसरपंच श्री. महेश धर्मेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या लता मोहन यादव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंडोजीराव ज्ञानदेव सावंत, ज्येष्ठ नागरिक संपत नाना माळी, सुभेदार मेजर भीमराव बाबुराव सावंत, अंकुश जाधव, मोहन यादव, रवींद्र सुळे, महेंद्र जाधव, कैलास सावंत, अरुण माने, विजय पवार, कृष्णत सावंत व ग्राम संघाच्या अध्यक्ष पुष्पा विजय क्षीरसागर तसेच बहुसंख्य ग्रामस्थ व कुलदीप आण्णा क्षिरसागर मित्रपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित होते.