कोरेगाव इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कोरेगांव : अधिक बर्गे
कोरोनो विषाणू संसर्ग सुरू असताना कोरेगाव इनरव्हील क्लबने कातकरी वस्तीमधील आबालवृद्धांना अन्नदान करून त्यांची भूक शमिवण्याचा छोटासा प्रयत्न केला. यंदा कोरोनाच्या संकटात येथील इनरव्हिल क्लबला गावातील नदीकाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या कातकरी समाजाची कणव आली.

हा समाज,सन व समारंभ यापासून अगदी कोसो दूर असतो. मासेमारी करायची आणि कसे तरी दोन घास खायचे अस त्यांचे जीवन.दोन घास भरवावेत, त्याची भूक शमावावी या हेतूनं क्लबच्या अध्यक्षा रोहिणी अधिक बर्गे, क्लबच्या सेक्रेटरी शशिकला नितिन ओसवालट्रेझरर नलिनी पांडुरंग बर्गे, संजिवनी चंद्रकांत मोरे यांनी कातकरी वस्तीत जाऊन तेथील आबालवृद्धांना एकत्र करून त्यांना अन्नदान केले. हे करताना त्यांनी जास्तीजास्त सामजिक अंतर पाळण्याचा प्रयत्न केला. तसेच या आबालवृद्धांना कोरोना विषाणूचा संसर्ग बचावासाठी , त्याची लागण होणार नाही यासाठी मास्कचे वाटप केले. संसर्गापासुन नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत अगदी सोप्या आणि त्यांना समजेल अशा शब्दात मार्गदर्शन केले. कातकरी बांधवांनी अन्नदान केल्याबद्दल आपल्या मोडक्या तोडक्या शब्दात कृतज्ञात व्यक्ती केली.




















