महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. करिअरची दिशा निश्चित करणाऱ्या बारावीच्या निकालाकडे दिशा ॲकॅडमीचे विद्यार्थी आणि पालक लक्ष लावून होते. अखेर निकालाची प्रतिक्षा संपली आणि ८ जून २२ रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालात दिशाच्या ३२० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत बाजी मारली. तब्बल २०७ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शनसह मिळवलेला फस्ट क्लास, ३१७ विद्यार्थ्यांनी मिळवलेला फस्ट क्लास आणि ३ विद्यार्थ्यांनी मिळवलेला सेकंड क्लास म्हणजेच दिशातील दर्जेदार शिक्षणाची पोहचपावतीच होय. आपल्या यशाचा आलेख चढता ठेवताना दिशाच्या २४ विद्यार्थ्यांनी ८५% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यामध्ये मुलींची सरशी दिसून आली. दिशा ॲकॅडमीचा सुमित पिसाळ ९२.५०% गुण मिळवत पहिल्या रँकवर आहे. वेदांतिका पोरे आणि पुष्कर येवले या दोघांनी ९०% मिळवत दुसऱ्या रँकवर कब्जा मिळवला आहे. ८९.६७% गुण मिळवत चैतन्या पाटील तिसऱ्या रँकवर आहे. अधिकाधिक गुणांची कमाई करत ८० ते ८५% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८५ आहे, तर १६७ विद्यार्थ्यांनी ७० ते ८०% गुण मिळवले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्य यशाबद्दल बोलताना दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम सर म्हणाले, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार या चक्रात न आडकता दिशा ॲकॅडमी सुरूवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी कटीबद्ध होती. वेळापत्रकाप्रमाणे केलेली अभ्यासाची आखणी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, वेळोवेळी घेतलेल्या सराव परीक्षा, शंकाचे समाधान हे यशापर्यंत पोहचण्याची वाट सुकर करत होते. जिद्द, चिकाटीच्या जोरावर आमचे विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते; या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजेच घवघवीत यश होय.

प्रा. डॉ. नितीन कदम यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करताना दिशा ॲकॅडमी भविष्यातील आव्हानांना पेलत शैक्षणिक क्षेत्रात अधिक सक्षमपणे भरीव योगदान देण्यासाठी तयार असल्याची ग्वाही दिशा ॲकॅडमीच्या व्यवस्थापिका प्रा. रूपाली कदम यांनी दिली. दिशा ॲकॅडमीचे सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकवर्गाने दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






















